शेवटाचं सत्य
जीवनाचा अखेरचा अध्याय
मृत्यूच असतो.
हे सत्य टाळता येत नाही,
फक्त स्वीकारता येतं.
श्वास मोजत जगणं नव्हे,
तर श्वासाला अर्थ देत जगणं महत्त्वाचं.
कारण शेवटी शरीर मातीला मिळतं,
उरते ती फक्त माणसातली माणुसकी.
कुणी विचारणार नाही
तुझ्याकडे किती होतं,
पण आठवण येईल.
तू कसा होतास.
जखमांवर फुंकर घातलीस का,
कुणाचं ओझं हलकं केलंस का,
दुःखात उभा राहिलास का.
याचीच उजळणी राहते.
मृत्यू सगळ्यांना समान असतो,
पण आठवणीत राहणं
हे निवडक आयुष्याचं फळ असतं.
म्हणून असा जग.
की तू गेल्यावरही.
तुझी जागा रिकामी वाटावी,
आणि तुझं नाव.
आदराने उच्चारलं जावं.
कारण जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू असलं,
तरी मरणानंतरही जगता येतं
आठवणींत.

0 Comments