⏳ क्षणभंगुर जीवन ⏳
जीवन हे क्षणभंगुर आहे, मानवा,
म्हणून क्षणाक्षणाला अर्थ दे.
आज जे आहे ते उद्या नसेल,
हे जाणूनही जगायला थांबू नकोस रे.
हसू, प्रेम, माया जपून ठेव,
कारण वेळ कोणासाठी थांबत नाही।
राग, द्वेष, अहंकार सोडून दे,
शेवटी काहीच सोबत येत नाही।
कालची वेदना, उद्याची भीती,
आजचा क्षण हिरावून घेतात।
जगायचं असेल तर आत्ता जग,
कारण उद्याचे श्वासही उधारच असतात।
फुल उमलतं, दरवळतं, कोमेजतं,
तरी आपलं कर्तव्य निभावतं।
माणसानेही तसंच व्हावं,
क्षणभंगुरतेतच उदात्तता शोधावं.
जीवन हे क्षणभंगुर आहे, मानवा,
हे सत्य स्वीकारून चाल.
माणूस म्हणून जगून जा,
मरणानंतरही आठवणीत राहील असा ठसा ठेवून जा.
🖉🖉 गणेश चापुलकर


0 Comments