🌾 गावातला पाहुणचार 🌾

दारात पाहुणा उभा दिसला की,
हसू उमटे प्रत्येकाच्या ओठी।
“या-या” म्हणत दार उघडताच,
मनाचं दारही उघडतं त्याच।

पाण्याचा घडा पुढे येतो,
थकवा क्षणात दूर होतो।
चुलीवर भाजी चढते पटकन,
प्रेम शिजतं आईच्या हातून नकळतच मन।

भाकरी, लोणचं, ताकाची धार,
या साधेपणात आहे संसार।
नसते थाटमाट, नसते दिखावा,
आपुलकी हाच असतो खरा ठेवा।

गप्पा रंगती रात्री उशिरापर्यंत,
हास्य मिसळे आठवणींत।
पाहुणा जातो भरलेल्या ऊराने,
आशीर्वाद देतो ओलसर डोळ्यांनी.

आजही गाव जपतो ही रीत,
माणुसकीची ती पवित्र गाथा गीत।
जिथे माणूसपणाला मान मिळतो,
तिथेच खरा पाहुणचार उमलतो।

            -  गणेश चापुलकर