ज्‍यांनी कष्‍टकरी, दलित, पददलित,  शेतकरी, शेतमजूर, स्‍त्री, आदिवासी समाज या सर्वांच्‍या उत्‍थानासाठी आपली लेखणी झिजवली अशा  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्‍यांच्‍या जयंती निमित्‍त विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या समग्र जीवनकार्याचा, त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍वाचा मागोवा घेताना प्रतिभावंताची प्रतिभा ही थिटी पडावी, शब्‍दसंपदा अपुरी पडावी असे महान जीवनकार्य त्‍यांचे आहे. त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍वाचा, जीवनकार्याचा मागोवा अनेक लेखकांनी, विचारवंतनी घेतला आहे. प्राचार्य टी.ए. गवळी, प्रा. सुखराम हिवराळे, डॉ. पी.ए. गवळी, प्रा. सुधिर गव्‍हाणे संपादित बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ या ग्रंथातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या समग्र जीवनकार्याचे मुल्‍यमापन करण्‍यात आले आहे.  त्‍यांचे जीवनकार्य सबंध विश्‍वाला प्रेरणादायी आहे. याच गौरव ग्रंथात यशवंत भंडारे यांनी बाबासाहेबांच्‍या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आहे. तो असा : 

-     नांव - भीमराव रामजी आंबेडकर

-    वडीलांचे नांव - रामजी मालोजी सकपाळ

-    आईचे नांंव -  भीमाबाई रामजी सकपाळ

-    जन्‍म -  14 एप्रिल 1891 इंदोरजवळील महू छावणीत मध्‍यप्रदेश येथे.

-    १८९४ दापोली येथे प्राथमिक शाळेत नाव दाखल.

-    १८९६ ला सातारा येथे शिक्षणाला प्रारंभ

-    १९०७ मॅट्रिक उत्‍तीर्ण

-    १९०८ एलफिन्‍स्‍टन कॉलेजमध्‍ये प्रवेश. रमाबाईंशी विवाह

-    १९१२ अर्थशास्‍त्र व राज्‍यशास्‍त्र विषय घेऊन बी.ए. उत्‍तीर्ण.

-    १९१३ पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन परीक्षा उत्‍तीर्ण

-    १९१३ मध्‍ये बडोदा येेथेे नोकरीसाठी प्रयाण.

    १२ फेब्रुवारी, १९१३ ला सुभेदार रामजी यांचे निधन

-    ४ जुन, १९१३ रोजी बडोदा येथे अमेरिकेतील शिक्षण संपल्‍यानंतर बडोदा सरकारची नोकरी करावी, या  

      करारपत्रकावर उपशिक्षणमंत्र्यासमोर सही केली. 

-    २१, जूलै, १९१३ ला उच्‍च शिक्षणासाठी कोलंबिया विश्‍वविदयालयात प्रवेश घेतला.

-    १९१५ ला प्राचीन भारतातील व्‍यापार या विषयावर प्रबंध लिहून एम. ए. पदवी संपादन केली.

-    १९२० कोल्‍हापूर येथील माणगांव मध्‍ये बहिष्‍कृतांच्‍या सभेत भाषण केले.

-    ३१ जानेवारी, १९२० ला मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले.

-    १९२२  द प्रॉब्‍लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहून लंदन विदयापीठाला सादर.  बॅरीस्‍टर पदवी उत्‍तीर्ण.

-    १९२३ मुंबई इलाखा विधिमंडळाचे सदस्‍य.

-    २० जूलै, १९२४  बहिष्‍कृत हितकारिणी सभा स्‍थापन.

-     ३ एप्रिल, १९२७ रोजी  बहिष्‍कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले.

-    १३, डिसेंबर १९२७ रोजी अमरावती येथे अंबादेवीच्‍या मंदिराचा सत्‍याग्रह.

-   ३ ऑगस्‍ट, १९२८ महार वतन हे विधेेेयक मुंबई विधिमंडळात मांडले.

-    १३ ऑक्‍टोबर, १९२९ पुण्‍यातील पर्वती मंदिराचा सत्‍याग्रह केला.

-    २ मार्च , १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर सत्‍याग्रह केला.

-    २४ नोव्‍हेंबर, १९३० रोजी जनता पाक्षिक सुरू केले.

-    १९४२ ऑल इंडिया शेडयुल्‍ड कास्‍ट फेडरेशची स्‍थापना.

-    १९४५ पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीची स्‍थापना.

-    १९४६ सिध्‍दार्थ महाविदयालयाची स्‍थापना.

-    १९४७ घटना समितीच्‍या मसुदा समितीवर अध्‍यक्षपदी  निवड.

-    वयाच्‍या ६५ व्‍या वर्षी म्‍हणजे ६ डिसेंबर, १९५६ ला  महानिर्वाण झाले. 

                      डॉ. बाबासाहेबांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!

**************************************************************************