शुध्‍द बिजापोटी, फळे रसाळ गोमटी ||
सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे ||
भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे||
        अशी मार्मिक रसाळ  अभंगवाणी चे निर्मिक जगद्गुरू त तुकाराम महाराज यांच्‍या चरणी साष्‍टांग दंडवत. दिनांक २० मार्च २०२१ संत तुकाराम महाराज बीज महाराष्‍ट्रामध्‍ये मोठया आनंदाने भक्‍तीभावाने साजरी केेली जाते. भक्‍त भाविकांच्‍या आनंदाला उधाण आलेले असते. 
अणुरेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा
संत तुकाराम महाराजांच्‍या जीवनावर प्रकाश टाकण्‍याचा माझा हा अल्‍पसा प्रयत्‍न आहे. संत तुकाराम महाराजांच्‍या जीवनकार्याचा आढावा घेण्‍याचा माझा प्रयत्‍न म्‍हणजे अणू एवढा आहे. असे मला वाटते. मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्‍यापणारी अभंगवाणी संत तुकाराम महाराजांनी रचली. 

संतकृपा झाली |  इमारत फळा आली||
ज्ञानदेवे रचिला पाया |  उभारिले देवालया ||
नामा तयाचा किंकर | तेणे केला विस्‍तार ||
जनी जनार्धन एकनाथ | स्‍तंभ दिला भागवत ||
तुका झालासे कळस |  भजन करा सावकाश ||
        संत बहिणाबाई  यांच्‍या वरील ओळी संपूर्ण भागवत धर्माची महती वर्णन करतात. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी उभारलेल्‍या भागवत धर्माची पताका संत नामदेव महाराजांनी आपल्‍या  कीर्तनाच्‍या माध्‍यमातून सर्वदूर नेली. या भागवत धर्माला भक्‍कम आधार देण्‍याचे कार्य संत एकनाथ महाराजांनी केले. भागवत धर्म रुपी मंदिराचा कळस होण्‍याचे महान कार्य संत तुकाराम महाराजांनी केले.  अभंग म्‍हणजे कधी न भंग पावणारे. तसे तुकाराम महाराजांची अभंग वाणी कधी ही भंग न पावणारी आहे. तुकाराम महाराजांची अभंगवाणी महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक परंपरेचे महान ध्‍योतक आहेे.  महाराष्‍ट्रातील जन सामान्‍याच्‍या ओठी गायले जाणारे अभंग म्‍हणजे तुकाराम महाराजांचे अभंग.  असे ही म्‍हंटले जाते की, तुकोबाची अमृतवाणी पडते देवाजीच्‍या कानी.  
        सतराव्‍या शतकामध्‍ये महाराष्‍ट्रातील प्रबोधकार म्‍हणून संत तुकाराम  महाराजांचा उल्‍लेख केला जातो. समाजामध्‍ये अस्तित्‍वात असलेल्‍या अनिष्‍ठ रुढी, परंपरा, यांच्‍यावर अतिशय निर्भिडपणे प्रहार करूून  जनजागृतीची मुहर्तमेढ  संत तुकाराम महाराजांनी रोवली. 
            नदीला माता म्‍हणतात. तशी इंद्रायणी ही नदी मातेचे रुप घेऊन आपला प्रवाह दैनंदिन वहन करीत आहे. अनेक घटना या इंद्रायणी नदीने आपल्‍या डोळयांनी पाहिलेल्‍या आहेत. निसर्गाच्‍या  सौंदर्यने नटलेले इंद्रायणी नदीकाठी वसलेले देेेहू हे गांव. याच पवित्र देहू  गावी संत तुकाराम महाराजांचा जन्‍म माघ शु. ०५ शके १५३०  इ.स.  २२  जानेवारी १६०८ मध्‍ये झाला. इंद्रायणी नदी म्‍हंटल की देहूू गाव येणारच. इंद्रायणी नदी आणि देहूू गावचा संबंध अमर आहे. इंद्रायणी काठी देहू गावात अंबिले कुटुंबात संत तुकाराम महाराजांचा जन्‍म झाला. धन्‍य ते अंबिले कुटुंब. पिता बोल्‍होबा आणि माता कनकाई यांच्‍या पोटी जन्‍मलेले तुकाराम महाराज यांनी जन मानसाच्‍या मनात पांडूरंगाच्‍या सोज्‍वळ भक्‍तीची वात पेटवली. 
        संत तुकाराम महाराज हे संत कवी होते. आजही वारकरी संप्रदयातील  कीर्तन  असो वा प्रवचन असो, पांडूरंगाचा जयघोष करताना शेवटी जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा नामघोष होत असतो.  जे का रंजले गांजले त्‍यासी म्‍हणे जो आपुले असे समाज जागृतीचे अभंंग रचना करून संत तुकाराम महाराजांनी रंजल्‍या गांजल्‍याची सेवा करण्‍यातच देव जाणावा. असा संदेश दिला. 
            सतराव्‍या शतकामध्‍ये समाजात प्रबोधान घडवून आणणारे थोर सुधारक म्‍हणूून संत तुकाराम महाराजांकडे पाहिले जाते. आपल्‍या साहित्‍यातून त्‍यांनी समाजातील दांभिकपणावर निर्भिडपणे प्रहार केले. त्‍यांच्‍या अभंगाची भाषा ही रसाळ, मधुर आहे. संत परंपरेत तुकाराम महाराज यांचा अभंग ओठी येणार नाही असा वारकरी नाही. 
                   रसाळ भाषा व सुमधुर अशा आवाजात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकताना माणूस मंत्रमुग्‍ध झाल्‍याशिवाय राहणार नाही. सुमधूर आवाजातील अभंगवाणी कितीतरी ऐकावी वाटते. आज खुप मोठा योग आहे. तुकाराम महाराज यांची बिज देहू या गावी मोठया आनंदाने साजरी केली जाते. महाराष्‍ट्रातील सर्व खेडया पाडयांत ही भाविक वारकरी मोठया आनंदाने तुकाराम महाराजांची बीज साजरी करत असतात. जीवन जगण्‍याचे तत्‍वज्ञान ज्‍या अभंगातून तुकाराम महाराजांनी मांडले ते अभंग अनेक गायकांनी आपल्‍या सुमधूर वाणीने संगितबध्‍द केले आहेत. नक्‍कीच ऐकायला आवडतात. काही निवडक अभंग आपल्‍यासाठी येथे देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. हाच तुकाराम महाराजांच्‍या चरणी माझा साष्‍टांग दंडवत. त्‍यांच्‍या पावन पवित्र जीवनकार्यावर अनेक महान विचारवंतांनी, इतिहासकारांनी, लेखकांनी प्रकाश टाकला आहे. 
||जय जय रामकृष्‍ण हरी || ||जय जय रामकृष्‍ण हरी || ||जय जय रामकृष्‍ण हरी ||
||जय जय रामकृष्‍ण हरी || ||जय जय रामकृष्‍ण हरी || ||जय जय रामकृष्‍ण हरी || 
||जय जय रामकृष्‍ण हरी || ||जय जय रामकृष्‍ण हरी || ||जय जय रामकृष्‍ण हरी || 

रंजल्‍या गांजल्‍यांंची सेेेवा करण्‍यातच देव जाणावा असे तुकाराम महाराज म्‍हणतात -
जे का रंजले गांजले  त्‍याशी म्‍हणे जो आपुले 

   निसर्ग प्रेेम आणि वृक्षवेलींची महती त्‍यांनी आपल्‍या अभंगातून वर्णीली आहे.


शब्‍दांचे महत्‍व वर्णन करणारे अभंग 


विठ्ठलाविषयी असणारी निस्‍सीम भक्‍ती त्‍यांच्‍या अभंगातून दिसून येते.

 
पंढरीसी जारे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ॥२॥
मागील परिहार पुढें नाही सीण । जालिया दर्शन एकवेळा ॥३॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्ती निवडेना ॥४॥


संत तुकाराम महाराज गाथा मंदिर

इंद्रायणी नदीवरील घाट

इंद्रायणी नदीचे दृश्‍य
इंद्रायणी नदीचे दृश्य
|| जय जय रामकृष्‍ण हरी ||