दिनांक 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्‍हणून साजरा केला जातो. या जागतिक महिला दिनाचा इतिहास असा की, महिलांनी स्‍वत:च्‍या न्‍याय हक्‍कासाठीहक्‍कासाठी दिलेल्‍या लढयाच्‍या स्‍मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्‍हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक महिला दिन न्‍युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्‍यात आला. 1990 साली आंतरराष्‍ट्रीय महिला परिषेदेतील सुचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्‍ट्रीय महिला दिन म्‍हणून साजरा करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले.


विसाव्‍या शतकाच्‍या सुरुवातीपर्यंत युरोप, अमेरिका व जवळजवळ सर्व जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार नव्‍हता. हा महिलांवर होणार अन्‍याय होता. या अन्‍यायाविरुध्‍द महिला आपापल्‍या परिने लढा देत होत्‍या.त्‍या. 1907 साली स्‍टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्‍ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. या परिषेदेत क्‍लारा झेटकीन या कम्‍युनिस्‍ट कार्यकर्ती महिलेने महिलांना सार्वत्रिक मतदानाचा हक्‍क मिळाला पाहिजेपाहिजे त्‍यासाठी लढा देणे हे समाजवादी महिलांचे कार्य आहे. अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी समाजवादी महिलांनी न्‍युयॉर्क शहरात मोठया प्रमाणात निदर्शने केली. महिलांच्‍या या निदर्शनाने क्‍लारा झेटकीन खुप प्रभावीत झाल्‍या. 1910 साली झालेल्‍या कोपनहेगन येथील आंतरराष्‍ट्रीय समाजवादी महिला परिषदेत क्‍लारा झेटकीन यांनी 8 मार्च 1908 च्‍या स्‍मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्‍हणून पाळण्‍यात यावा असा ठराव मांडला व तो मान्‍य करण्‍यात आला. याचा परिणाम म्‍हणून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्‍हणून साजरा केला जातो.

भारतामध्‍ये मुंबई येथे 8 मार्च 1943 साजरा करण्‍यात आला.आला. 8 मार्च 1971 पुण्‍यात मोठा मोर्चा काढण्‍यात आला.आला. 1975 हे जागतिक महिला वर्ष म्‍हणून साजरे केले गेले. स्‍त्रीयांच्‍या संघटनांना बळकटी आली. स्‍त्रीया आपल्‍या समस्‍या मांडण्‍यासाठी पुढे येऊ लागल्‍या. बदलत्‍या सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवनानुसार महिलांचे जीवन बदलत गेले. स्‍त्री संघटनांच्‍या मागण्‍या बदलत गेल्‍या. महिलांचा सन्‍मान हा महत्‍वाचा आहे. हा विचार पुढे आला. नारीशक्‍तीचा सन्‍मान हा खुप महत्‍वाचा आहे. ही विचारसरणी आज समोर येत आहे.

स्‍त्री ही आदिशक्‍ती आदिमाया आहे. स्त्रीशिवाय जग पुर्ण नाही.